Vidarbha Heatwave Schools Timings Changed राज्यात मागील काही दिवसापासुन तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे. भारतीय हवामान विभाग नागपुर यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार आता खबरदरी म्हणून शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे.
Vidarbha Heatwave Schools Timings Changed
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ पोटकलम (१) मधील धारा १४ उपधारा (१) भधील अधिसुचनेनुसार जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच कलम २५ मधील पोटकलम २ मध्ये प्राधीकरणांतर्गत जिल्हाधिकारी यांना अध्यक्ष म्हणुन आपत्तीच्या प्रसंगी कार्यवाही, आदेश, निर्णय घेणे इत्यादी बाबत अधिकार प्राप्त झालेले आहे.
त्याअनुषंगाने यवतमाळ जिल्हयात मागील काही दिवसापासुन तापमानामध्ये वाढ होत आहे. भारतीय हवामान विभाग नागपुर यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार दिनांक १६/०४/२०२५ रोजी ४३.४ सेल्सीयस, दिनांक १७/०४/२०२५ रोजी ४३.४ सेल्सीयस, दिनांक १८/०४/२०२५ रोजी ४३.५ सेल्सीयस, दिनांक १९/०४/२०२५ रोजी ४३.५ सेल्सीयस, दिनांक २०/०४/२०२५ रोजी ४३.६ सेल्सीयस, तापमानाची नोंद झाली असुन मागील ५ दिवसात विदर्भात जास्त तापमानाची नोंद ही यवतमाळ जिल्हयात झालेली आहे.
त्यामुळे उष्ण तापमानाचा परिणाम हा प्राथमिक वर्गामध्ये (नर्सरी ते वर्ग ७वी पर्यंत) शिकत असलेल्या मुलांचे आरोग्यवार होऊ नये. याकरीता, जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधिकरण यवतमाळ यांनी खबरदारी म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित असलेल्या परीक्षा वगळता (नर्सरी ते वर्ग ७वी पर्यंत) सुरु असलेल्या शासकीय व निमशासकीय शाळा पुढील ८ दिवस सकाळी ७.०० ते १०.०० मी. पर्यंत सुरु ठेवण्यात यावे असे या आदेश काढण्यात आले आहे. सदर आदेश हा शासकीय व निमशासकीय शाळांना लागु राहणार आहे.
