Varishatha Nivadshreni Prashikshan Nondni महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हे प्रशिक्षण वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीसाठी आवश्यक आहे.
वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी | Varishatha Nivadshreni Prashikshan Nondni
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्याद्वारे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक शिक्षकांना परिषदेच्या www.maa.ac.in या वेबसाइटवर नोंदणी करता येणार आहे.
नोंदणीसाठी पात्रता
- वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
- निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी ३० एप्रिल २०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे.
नोंदणी करण्याचा कालावधी
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव दिनांक २१/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक २१/०४/२०२५ पासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करण्याबाबत SCERT पोर्टल द्वारे कळविण्यात आले आहे.
अर्जासाठी आवश्यक माहिती
नोंदणी करताना, शिक्षकांनी शालार्थ/सेवार्थ/बीएमसी प्रणालीवर नोंदवलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. त्यात खालील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
- स्वतःचे नाव (देवनागरी लिपी)
- लिंग
- जन्म दिनांक
- पदनाम
- UDISE क्रमांक
- जिल्हा, तालुका
- शाळा व्यवस्थापन प्रकार
- नियुक्ती दिनांक
- शाळेचे नाव
- मुख्याध्यापकाचे नाव व संपर्क क्रमांक
- व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता
- मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी
नोंदणी प्रक्रिया
- नोंदणी करतेवेळी शालार्थ/सेवार्थ/बीएमसी पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, जो प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, भरलेल्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षण गट आणि प्रकार निवडण्याची जबाबदारी पूर्णपणे शिक्षकांची असेल.
प्रशिक्षणाचे गट
प्रशिक्षणासाठी एकूण चार गट आहेत:
- प्राथमिक गट (इ. १ली ते ४ थी, इ. १ली ते ५ वी, इ. १ली ते ७ वी, इ. १ली ते ८ वी, इ. ६ वी ते ८ वी)
- माध्यमिक गट (इ. ९ वी, १० वी)
- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी, १२ वी)
- अध्यापक विद्यालय गट
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांना माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडण्याची सूचना देण्यात आली आहे.
प्रशिक्षण शुल्क
प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी २,०००/- रुपये शुल्क असून, ते ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
प्रशिक्षणाचे स्वरूप
वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण ऑफलाइन पद्धतीने असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत एकाच वेळी आयोजित केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या सूचना
- प्रशिक्षणासंबंधी सर्व आवश्यक माहिती https://maa.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- प्रशिक्षणादरम्यान अद्ययावत सूचना वेळोवेळी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.
- प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हे प्रमुख अधिकारी असतील.
- नोंदणी प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर, नोंदणी पावतीची पीडीएफ प्रत जपून ठेवावी.
- तांत्रिक अडचणी असल्यास gradetraining@maa.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
- प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होतील, परंतु साहित्य इंग्रजी आणि उर्दूमध्ये उपलब्ध असेल.
शिक्षण विभागाने सर्व संबंधित शिक्षकांना या सूचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी: परिपत्रक येथे डाउनलोड करा