राज्यातील सर्व शाळांसाठी Maha School GIS App द्वारे शाळांची भौगोलिक माहिती संकलित होणार असून, यासाठी Maha School Geo Tagging अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर सूचना शालेय शिक्षण विभागाने २३ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.
Table of Contents
Maha School Geo Tagging
राज्यातील सर्व शाळांबाबतच्या विविध माहितीचा (UDISE Plus डेटाबेस) उपयोग धोरण तयार करताना व योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येतो. मात्र अद्याप भौगोलिक माहिती (जसे की स्थान, इमारतींची स्थिती, सुविधा इत्यादी) अद्ययावत नव्हती. ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) सोबत 4 फेब्रुवारी 2025 रोजी एक करार करण्यात आला आहे.
Maha School GIS अॅपचे महत्त्व
या कराराअंतर्गत Maha School GIS App विकसित करण्यात आले असून, याच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांचे भौगोलिक स्थान (GIS Location), फोटोंसहित इमारतींची व सुविधा यांची माहिती एकत्रित करून एका डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
उद्दिष्ट
या उपक्रमामुळे शालेय शिक्षण विभागाला धोरण आखणी, योजना अंमलबजावणी, व विविध शासकीय सुविधा नियोजनामध्ये भौगोलिक माहितीचा वापर करता येईल.
शाळांसाठी आवश्यक कार्यवाही
- मुख्याध्यापकांनी UDISE Plus मधील नोंदवलेला मोबाईल नंबर वापरून Maha School GIS अॅपमध्ये लॉगिन करायचा आहे.
- लॉगिननंतर:
- Latitude & Longitude सह शाळेचे स्थान कॅप्चर करणे
- शाळेचे 5 फोटो अपलोड करणे: संपूर्ण इमारत, शिक्षण शेड, मुला-मुलींची स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- ही माहिती 30 एप्रिल 2025 पूर्वी अॅपमध्ये भरावी लागेल.
- फोटो भरताना मुख्याध्यापक स्वतः उपस्थित राहून ती माहिती अद्ययावत करतील.
- संबंधित शिक्षणाधिकारी हे काम सर्व शाळांनी पूर्ण केल्याची खातरजमा करतील.
शासन परिपत्रकातील महत्वाच्या सूचना
दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार Maha School Geo Tagging संदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
- महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक स्थान छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तांत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरिता Mobile App: “Maha School GIS” ॲप विकसित केले आहे.
- सदर ॲपमध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लस मधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदवलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करून शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, शिक्षण शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करून शाळेने माहिती भरायची आहे.
- सदर माहिती संबंधित ॲपवर भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या परिसरात उपस्थित राहून फोटो/ माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी.
- सदर माहिती संबंधित ॲपवर दिनांक 30 एप्रिल, 2025 पर्यंत अद्ययावत करण्यात यावी.
- सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी.
- निर्धारित मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संगणविष्ट कराव्यात.
हा निर्णय शाळांची माहिती अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने मोठा पाऊल आहे. भविष्यातील शिक्षणविषयक योजना अधिक माहितीपूर्ण आणि प्रभावी ठरण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.