BMC Clerk Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'लिपिक' पदांच्या 1178 जागांसाठी जाहिरात, ऑनलाईन अर्ज सुरु..

BMC Clerk Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील इच्छुक व पात्र कर्मचाऱ्यांसाठी आता कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या 1 हजार 178 रिक्त जागा भरण्यात येत आहे, यासाठी कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 जून 2023 पर्यंत आहे सविस्तर जाहिरात पाहूया...

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदांच्या 1178 जागांसाठी जाहिरात

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील 'कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनाम 'लिपिक') या पदाची विहित अर्हता धारण करीत असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून 'कार्यकारी सहायक' या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्या कर्मचा-यांची वेतनश्रेणी (असुधारित वेतनश्रेणीनुसार ग्रेडपे) कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदाच्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक आहे, असे इच्छुक कर्मचारी देखील निम्नसंवर्गातून निवड पध्दतीने कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) पदासाठी अर्ज करु शकतील. 

निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पध्दतीने भरावयाच्या 'कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम 'लिपिक') पदाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

  1. पदाचे नाव - कार्यकारी सहायक
  2. वेतनश्रेणी (सुधारित) - स्तर M13 रु. 21,700 69.100
  3. वेतनश्रेणी (असुधारित) - 5200 - 66666 + 2000 श्रेणीवेतन
  4. भरावयाच्या रिक्त पदांची संख्या - 1178

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 171 पदांसाठी भरती

आवश्यक अहर्ता

निम्नसंवर्गातील कर्मचा-यांमधून निवड पद्धतीने 'कार्यकारी सहायक पदावर नियुक्तीकरीता विहित अर्हता पुढीलप्रमाणे आहे.

  • उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 
  • उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवाराजवळ एम.एस.सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासनाने विहित केलेल्या आदेशानुसार) संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने परिपत्रकांमधील तरतूदी त्यांना लागू होतील. अंमलात आणलेल्या
  • उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट प्रेझेनटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.

ऑनलाईन अर्ज मार्गदर्शक सूचना


राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी मोठी भरती
कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांची मेगा भरती
पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरती सुरु येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now